केबल वर्चस्वातून मानखुर्दमध्ये गोळीबार

सकाळच्या वेळेस झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.

केबल वर्चस्वातून मानखुर्दमध्ये गोळीबार
SHARES

मुंबईच्या मानखुर्द परिसरातील मोहिते पाटील नगर येथे केबलच्या वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मात्र या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी  तिघां विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचाः- देशाअंतर्गत विमानसेवेत १० टक्के वाढ

मानखुर्दच्या मोहिते पाटील नगरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर केबलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सुरू असलेल्या केबलजोडणीचा सरकार दप्तरी कोणताही हिशोब नसल्याचे कळते. त्यामुळे केबल कनेक्शन वाढीसाठी जोतो वर्चस्व करू पहात आहे. याच केबल व्यवसायाच्या वादातून या परिसरात काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. गुरूवारी सकाळी या वादातून सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चाळ क्रमांक १३ मध्ये राहणारे राजेश टूनटून ठाकूर (४३) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सार्वजनिक शौचालयात जात असताना चाळ क्रमांक १२-१३ मधील गल्ली समोर आकाश रामकपूर यादव, विवेक रामकपूर यादव, योगेश प्रसाद हलवाई यांनी संगनमत करून राजेश ठाकूर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आपल्याकडील पिस्तूलातून त्यांच्या दिशेने एक गोळी झाडली.

हेही वाचाः-  मुंबई : वृक्ष प्राधिकरणानं इन्फ्रा प्रकल्पांसाठी १,२३४ झाडं तोडण्यास दिली मान्यता

वेळीच राजेश ठाकूर शौचालयात पाळल्याने ते बचावले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सकाळच्या वेळेस झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. राजेश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील फरारी आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा