शिवसेना कार्यकर्त्यानेच जाळली घोसाळकरांची बीएमडब्ल्यू

 Mumbai
शिवसेना कार्यकर्त्यानेच जाळली घोसाळकरांची बीएमडब्ल्यू

दहीसर - वॉर्ड क्रमांक 1 चे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या बीएमडब्लू कारला आग लावणारा शिवसेना कार्यकर्ताच असल्याचे उघडकीस आले आहे. दीपक खवडे असं या शिवसेना कार्यकर्त्याचे नाव असून, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडले आहे. दरम्यान, बोरीवली कोर्टात दीपकला हजर केले असता त्याला बोरीवली कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. गणपती उत्सवाच्यावेळी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काही मुलांसोबत बाचाबाची झाली होती. त्याच ग्रुपमध्ये दीपक खवडे देखील होता. त्यामुळे याच वैमनस्यातून त्याने ही आग लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

14 फेब्रुवारीला संध्याकाळी दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा लक्ष्मण म्हात्रे रोडवर शिवसेनेची जाहीर सभा होती. त्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर आले होते. त्यावेळी म्हात्रे रोडवर घोसाळकर यांनी आपली MH47-0011 ही गाडी पार्क केली होती. मात्र अचानक 9 च्या सुमारास त्यांच्या कारला आग लागल्याची घटना घडली होती.

Loading Comments