कांद्याच्या नावाखाली रक्त चंदनाची तस्करी

कंटेनरमध्ये 29 हजार कांदा असल्याचे कागदपत्रांमध्ये जाहीर करण्यात आले होते. पण तपासणीत त्यात 13 हजार किलो रक्त चंदन असल्याचे निष्पन्न झाले.

कांद्याच्या नावाखाली रक्त चंदनाची तस्करी
SHARES

कांद्याच्या नावाखाली न्हावा शेवा येथून शारजामध्ये रक्त चंदन पाठवणा-या टोळीचा पदडाफाश करण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला(डीआरआय) यश आले आहे. याप्रकरणी १३ हजार किलो रक्त चंदन जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सव्वा पाच कोटी रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही  वाचाः- मुंबईत लाँकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा दाखल

न्हावा शेवा येथून शारजामध्ये रक्त चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार शोध मोहिम राबवून संशयीत कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमध्ये २९ हजार कांदा असल्याचे कागदपत्रांमध्ये जाहीर करण्यात आले होते. पण तपासणीत त्यात १३ हजार किलो रक्त चंदन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत पाच कोटी वीस लाख रुपये असल्याची माहिती  डीआरआयच्या अधिका-याने दिली. रक्त चंदन लवपवण्यासाठी १७  हजार किलो कांदा त्यावर भरण्यात आला होता. १३ हजार किलो रक्त चंदन जप्त केल्यानतर याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून त्यामुळे आरोपींची नावे जाहीर करण्यास केंद्रीय यंत्रणेने नकार दिला. आरोपींना न्यायालयाने डीआरआय कोठडी सुनावली आहे.

हेही  वाचाः- मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मध्य रेल्वेने केला मोठा खुलासा

या पूर्वी अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी कांद्याचा उपयोग करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. मार्च २०१९ मध्ये मुंबईचे अंमली पदार्थ विभागाचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान युनिटने कांद्याच्या नावाखाली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी त्यावेळी ट्रकमधून ५०० किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. ओला कांदा किंवा सोललेल्या कांद्याला प्रचंड वास येत असतो. याच संधीचा फायदा घेत तस्कर घेतात. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा