बटनामध्ये कोकेन लपवून तस्करी

तळोजा परिसरात ही कारवाई करण्यात आली. तिघांवरही अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना याप्रकरणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

बटनामध्ये कोकेन लपवून तस्करी
SHARES

 दक्षिण आफ्रिकेतील कुरियर पार्सलमध्ये लवपून  ड्रग्सच्या तस्करीचा पडदाफाश करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला(डीआरआय) यश आले आहे. आरोपींकडून 400 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. महिलांच्या गाऊनच्या आयातीच्या नावाखाली ड्रग्सची तस्करी करण्यात आली होती. आरोपींनी गाऊनच्या बटनांमध्ये ड्रग्स लवपले होते. याप्रकरणी दोन नायजेरीयन नागरीकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- फॅशनेबल मास्क पण उपयोग कमीच!

डीआरआयने सात दिवस मोहिम राबवून ही कारवाई केली. त्याला ऑपरेशन क्रुगर हे नाव देण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे हे कुरियर ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील गाऊनला मोठी बटन होती. त्यावरून संशय आल्याने तपासणी केली असता बटनांच्या आत कोकेन सापडले. एकूण 396 ग्रॅम ड्रग्स सापडले आहे. त्यानंतर वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन आरोपींना अटक करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याची परवानगी मागितली. त्यात ड्रग्स स्वीकारण्यास आलेल्या एका संशयीताला ता्यात घेण्यात आले. त्यानंतर तो हे ड्रग्स नायजेरीयन तस्करांना पुरवणार होता. त्याच्या मदतीने दोन नायजेरीन नागरीकांनाही अटक करण्यात आली.

हेही वाचाः- पाणी जपून वापरा; 'या' भागात २ व ३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा नाही

तळोजा परिसरात ही कारवाई करण्यात आली. तिघांवरही अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना याप्रकरणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ऑपरेशन क्रुगर अंतर्गत गेल्या दहा दिवसांत परदेशी तस्करांविरोधात डीआरआयने चार मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्याचे धागे आफ्रीका व अमेरिकेपर्यंत पोहोचले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा