COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

काळविटाच्या कातडीची तस्करी, गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

भिवंडी, नवी मुंबई, मुंबई, नाशिक तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या परिसरातील तस्करांनी प्राण्यांच्या तस्करीसाठी आपला मोर्चा ठाण्याकडे वळवल्याचे अनेक कारवाईतून समोर येत आहे.

काळविटाच्या कातडीची तस्करी, गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
SHARES

जयपूर मध्ये शुटींग दरम्यान काळवीटची शिकार करणे अभिनेता सलमान खानला महागात पडले होते. या प्रकरणात सलमानला जयपूर तुरुंगाची हवाही खायला लागली होती. याच काळवीट प्राण्याच्या कातडीच्या तस्करीचा डाव मुंबई पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी जाॅन सुंदर रायसमाला (३४) याला घाटकोपर परिसरातून अटक केली आहे.

हेही वाचाः- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

शिवडी परिसरात राहणारा आरोपी जाॅन सुंदर रायसमाला हा अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर संशयित रित्या पोलिसांना फिरताना आढळला. त्यांच्या पाठीवर काळ्या रंगाची सॅक होती. पोलिसांना पाहून त्याने वाट बदलल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिस त्याच्या जवळ जाऊ लागल्यानंतर त्याला घाम फुटला. त्यामुळे जाॅन हा काहीतरी लपवत असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानुसार पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता. त्याच्या बॅगेतील एका गोणीत काळवीटचे कातडे आढळून आले. या कातड्याच्या तस्करीसाठी जाँन हा आला असल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली.

हेही वाचाः- पोलीस मारहाण प्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्याला ३ महिन्यांची शिक्षा

बाजारात या काळवीटाच्या कातडीची किंमत ही ३ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी जाँनवर कलम ९,३९,४४,४८(अ),५१ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. हे कातडे त्याने कुठून आणले, या प्रकरणात अन्य कुणा कुणाचा हात आहे. याचा पोलिस आता शोध घेत आहे. दरम्यान मागील अनेक कारवाईत येऊरसारखा निसर्गरम्य आणि वन्यजीवसंपदा असलेला परिसर वन्य प्राण्यांच्या तस्करीमुळे कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. भिवंडी, नवी मुंबई, मुंबई, नाशिक तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या परिसरातील तस्करांनी प्राण्यांच्या तस्करीसाठी आपला मोर्चा ठाण्याकडे वळवल्याचे अनेक कारवाईतून समोर येत आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा