घरपोच दारुसाठी ‘इतक्या’ जणांनी केले परवान्यासाठी अर्ज

राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल ३१ लाख ५५ हजार ८१३ ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे.

घरपोच दारुसाठी ‘इतक्या’ जणांनी केले परवान्यासाठी अर्ज
SHARES

लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली असली. तरी आँनलाईन दारू मागवताना दारू पिण्यासाठी लागणारा परवाना असणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहित आहे का?  जर हा परवाना नसेल तर तुम्हाला दारू मागवता येणार नाही. सध्या महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते.

हेही वाचाः- महाराजांबद्दल अपशब्द, मनसेनं केलं खळ खट्याक...

काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात. मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात.

हेही वाचाः- ठाणे-वाशी लोकल सुरू, ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा

१ एप्रिल ते ३० जून पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्य परवान्यासाठी १ लाख ४३ हजार ६५६ अर्ज आलेले आहेत. त्यातील  १ लाख ३८ हजार ४९७ जणांच्या परवान्यांना मंजूरी देण्यात आली. राज्यात १५ मे २०२० रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल ३१ लाख ५५ हजार  ८१३ ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०, ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७९३३ अनुज्ञप्ती सुरू आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा