एनआयए कोर्टाने दिली साध्वी प्रज्ञाला सूट, सुनावणीला हजर राहण्याची गरज नाही

लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सूट मिळावी, अशी मागणी मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केली होती.

एनआयए कोर्टाने दिली साध्वी प्रज्ञाला सूट, सुनावणीला हजर राहण्याची गरज नाही
SHARES

लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सूट मिळावी, अशी मागणी मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केली होती. ही मागणी मान्य करत मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणे (NIA)च्या विशेष न्यायालयाने प्रज्ञा सिंग यांना दिलासा दिला आहे. 

काय दिलं कारण?

खासदार असल्याने मला संसदेच्या कामकाजात रोज भाग घ्यावा लागतो, त्यामुळे न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सूट मिळावी, अशी मागणी प्रज्ञा सिंग यांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. 

न्यायालयाची नाराजी

याआधी प्रज्ञा यांच्यासोबत मालेगाव बाॅम्बस्फोटातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसंच आरोपी न्यायालयात हजर राहात नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. 

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरण

मालेगावमध्ये सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या दुचाकी बाॅम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासहित लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय इ. आरोपींना जामीन दिला होता.



हेही वाचा-

मालेगाव बाॅम्बस्फोट: सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहाण्याचे कोर्टाचे आदेश

मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा