मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर

मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया अशी या चौघांची नावे आहेत.

मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर
SHARES

मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

दोषमुक्त करा

या प्रकरणातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित तसंच समीर कुलकर्णी यांना दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मला ठाऊक नाही 

मालेगाव स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नियमीत सुनावणी सुरू आहे. त्यानुसार सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा सुनावणीसाठी न्यायालयात हजर व्हावं असे आदेश दिले होते. मात्र प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयाच्या सूचनेनुसार न्यायालयात हजर राहणं शक्य न झाल्याने न्यायालयाने त्यांना झापलं होतं.

मात्र त्यानंतरच्या सुनावणीला हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याला मालेगाव स्फोटाबाबत काहीही माहीत नसल्याचा जबाब नोंदवला होता. तसंच तब्येत बरी नसूनही न्यायालयात साधी बसण्याची जागा उपलब्ध नसल्याबद्दल त्रागाही व्यक्त केला होता. 



हेही वाचा-

मालेगाव बाॅम्बस्फोट: सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहाण्याचे कोर्टाचे आदेश

साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, एनआयए न्यायालयाने फेटाळली याचिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा