Video- जोगेश्वरीत भरधाव कारनं तरुणीला उडवलं, तरूणी कोमात

अंधेरीच्या 'एमआयडीसी' परिसरात राहणारी सायली ३० डिसेंबरला क्लासमधून घरी जात होती. त्यावेळी मोबाइमध्ये मग्न असलेल्या सायलीला मागून आलेल्या चारचाकी कारने जोरदार धडक दिली. गाडीचा वेग इतका होता की धडकेनं सायली जवळपास १० फूट उंच उडाली आणि समोर असलेल्या विजेच्या खांबाला आपटून फूटपाथवर कोसळली.

SHARE

मुंबईतील जोगेश्वरी इथं ३० डिसेंबर रोजी भरधाव वेगात असलेल्या एका कारने तरुणीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपघातात जबर जखमी झालेली ही तरुणी सध्या कोमात असून आहे. सायली राणे असं अपघातग्रस्त तरुणीचं नाव आहे. तिच्यावर अंधेरीतील होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कशी घडली घटना?

अंधेरीच्या 'एमआयडीसी' परिसरात राहणारी सायली ३० डिसेंबरला क्लासमधून घरी जात होती. त्यावेळी मोबाइमध्ये मग्न असलेल्या सायलीला मागून आलेल्या चारचाकी कारने जोरदार धडक दिली. गाडीचा वेग इतका होता की धडकेनं सायली जवळपास १० फूट उंच उडाली आणि समोर असलेल्या विजेच्या खांबाला आपटून फूटपाथवर कोसळली.

या अपघातात सायली जबर जखमी झाली. अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला असून चालक देखील गंभीर दखमी झाला आहे. 'एमआयडीसी' पोलिसांनी संबंधित गाडी ताब्यात घेतली असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.हेही वाचा-

"थर्टीफर्स्ट"च्या रात्री पोलिसांचीच बोट बुडाली, १ पोलिस जखमी

दारू पिऊन गाडी चालवाल, तर ६ महिन्यांसाठी लायसन्स होईल रद्दसंबंधित विषय
ताज्या बातम्या