SRPF जवानाने स्वत: वर झाडली गोळी, प्रकृती नाजूक

मलाबार हिल येथील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन इथं तैनात राज्य राखीव दला(CRPF) तील एका जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

SHARE

मलाबार हिल येथील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन इथं तैनात राज्य राखीव दला(CRPF) तील एका जवानाने स्वत: वर  गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या जवानाचं नाव दत्तात्रय चव्हाण (२८) असं आहे.  

सीआरपीएफ स्टाफ क्वार्टर्समध्ये दत्तात्रय चव्हाण यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज ऐकून त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा चव्हाण त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर चव्हाण यांना त्वरीत जखमी अवस्थेत एलिझाबेथ रूग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर पुढील उपचारांसाठी बॉम्बे रूग्णालयात नेण्यात आलं. 

दत्तात्रय मूळचे औरंगाबाद इथं राहणारे आहेत. दत्तात्रय चव्हाण यांच्याजवळ एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. घरातील वादाला कंटाळून असं कृत्य करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यावेळी चव्हाण सुट्टीवर होते.

या संदर्भात मलबार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चव्हाण यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.हेही वाचा-

भिकाऱ्याच्या झोपडीत सापडली लाखोंची चिल्लर

मुंबईत ४६ टक्के विद्यार्थी पाहतात पॉर्न व्हिडीओसंबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ