बेकायदा वाहनांवर कारवाई करणाऱ्या एसटी अधिकाऱ्याला मारहाण


बेकायदा वाहनांवर कारवाई करणाऱ्या एसटी अधिकाऱ्याला मारहाण
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे मार्गावर खासगी अवैध्य वाहनचालक प्रवाशांना सेवा पुरवत आहेत. त्यामुळं या वाहनांनवर कारवाई करण्यासाठी एसटी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या एसटी अधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. ज्ञानेश्वर बाबुराव पाटील असं त्यांच नाव असून मंगळवारी रात्री त्यांना मारहार करण्यात आली.

बेकायदा प्रवासी वाहतूक

दादर येथून मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या बेकायदा वाहनांवर देखरेख ठेवणं आणि यापासून प्रवाशांना सावध करणं या कामसाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक पाटील यांची दादर एसटी स्थानकात नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी कर्तव्यावर असताना दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनानं पाठीमागून धडक दिली.

धक्काबुक्की करत मारहाण

त्यानंतर त्या वाहनांच्या चालकानं ज्ञानेश्वर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या घटनेत ज्ञानेश्वर यांच्या डाव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली असून कानाला टाके पडले आहेत.



हेही वाचा -

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

लोकलवरील दगडफेकीत एकात दिवसात ४ जण जखमी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा