रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि अमली पदार्थ पुरवठा प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि अमली पदार्थ पुरवठा प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) दोघांना अटक केली होती. न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची न्यायालयीन कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

रिया आणि शौविक यांचा संबंध अमली पदार्थांशी असल्याचं तपासात आढळून आलं. त्यामुळे एनसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याअंतर्गत एनसीबीने रिया व शौविकसह अन्य संबंधितांना अटक केली आहे. तसंच काही दलालांनाही अटक केली आहे. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एनसीबीने केला.

सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना एनसीबीने अटक केली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही एनसीबीकडून तपास सुरू आहे.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया मुख्य आरोपी आहे. आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू आहे. रिया आणि अन्य आरोपींनी मोबाइलमधून काढून टाकलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश ईडीने प्राप्त केले. त्यातून रिया आणि अन्य आरोपी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली. त्यानंतर एनसीबीने गुन्हा नोंदवून  तपास सुरू केला.



हेही वाचा -

रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, सुशांतला ‘या’ व्यक्तींमुळे लागली ड्रग्जची सवय

तीन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर रिया चक्रवर्तीला अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा