रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, तिसऱ्या दिवशी चौकशीला हजर

अंमली पदार्थाच्या सेवनावरून मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि मॅनेजर सॅम्युअल मिरांडा,सुशांत सावंतया तिघांच्या अटकेनंतर रिया भोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला आहे. आज तिसऱ्यांदा रियाला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले

रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, तिसऱ्या दिवशी चौकशीला हजर
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता तीन महिने उलटत आले. मात्र आजही सुशांतच्या आत्महत्या करण्यामागील कारण गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात अंमली पदार्थाच्या सेवनावरून मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि मॅनेजर सॅम्युअल मिरांडा,सुशांत सावंतया तिघांच्या अटकेनंतर रिया भोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला आहे. आज तिसऱ्यांदा रियाला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे रियाच्या  डोक्यावर अटकेची टांगती तलवार लटकत असल्याचे म्हटंल्यास चुकीचे ठरणार नाही.

हेही वाचाः- ईडीचा चंदा कोचर यांना दणका, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पतीला अटक

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने उडी घेतली आहे. तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. एनसीबीने अनेक लोकांची चौकशी आतापर्यंत केली. रविवारपासून रिया चक्रवर्तीचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली. रविवारी साधारणपणे सात तासाच्या चौकशीनंतर एनसीबीच्या टीमने रियाला दुसऱ्या दिवशी सोमवारीही चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर मंगळवारीही रिया चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० च्या सुमारास हजर राहिली. रियाची काल केलेल्या चौकशीत तिने अंमली पदार्थ स्वतः घेणं, विकत घेणं, हातात घेणं याबद्दस स्पष्ट नकार दिला. नारकोटिक्सलाही रियाला अटक करण्यापूर्वी पक्के पुरावे जमा करायचे आहेत. यावरच तिला न्यायालयात उभं केलं जाऊ शकतं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी रिया चक्रवर्तीला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले.

हेही वाचाः- महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध

एनसीबीच्या चौकशीच्या दुसर्‍या दिवशी केलेल्या चौकशीत रिया चक्रवर्तीने बॉलिवूडमधील काही बड्या लोकांची नावं घेतल्याचं समोर आलं आहे. सुमारे १८ ते १९ जणांची नावं रियाने घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बॉलिवूड सेलिब्रिटींवरही चौकशीची टांगती तलवार लटकत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एनसीबीने आता पर्यंत केलेल्या कारवाईत या प्रकरणाशी संबधित तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी सुशांतला अंमली पदार्थ आणून दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे यात रियाचा सहभाग निश्चिच झाल्यास तिलाही अटक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा