सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची जाणून बुजून बदनामी, ८० हजार बनावट अकाऊंट उघडकीस

मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी म्हटलं आहे.

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची जाणून बुजून बदनामी, ८० हजार बनावट अकाऊंट उघडकीस
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाता तपास सुरवातीपासून मुंबई पोलिस योग्य पद्धतीने करत होते. मात्र काही जणांनी छरवून मुंबई पोलिसांची या प्रकरणात बदनामी केली. तर काहींनी ठरवून मोहिम चालवली गेल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. एम्सने देखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले. मात्र मुंबई पोलिसांविरोधात रचलेल्या षडयंत्राची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई सायबर युनिटने केलेल्या  रिपोर्टनुसार 14 जूननंतर सुशांत मृत्यू तपास करणाऱ्या मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांना बदनाम करण्यासाठी 80 हजार बनावट अकाउंट उघडली गेली. पोलंड, इटली, जपान, तुर्की, थायलंड आदी देशांमधून सोशल मीडिया वापरला गेला आहे.  

हेही वाचाः- हा तर मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट- संजय राऊत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी म्हटलं आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला. सिंग म्हणाले, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे. आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचाः- १५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार, सरकारच्या गाइडलाइन्स जारी

काही मीडियानंही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली. १६ जून सुशांतचा कुटुंबियांची विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा