चीनने गुप्तहेरास मदत केल्याचे उघड, हेरगिरीत आरोपीला आतापर्यंत ११ लाख रुपयांचा फायदा

दुबई, पूच्छ आणि राजोरी परिसरातील माहिती या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने पाकिस्तानमध्ये पुरवायचा, मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील दोन क्रमांकाच्या सहाय्याने हे सर्व दूरध्वनी डायवर्ट करण्यात आले आहेत.

चीनने गुप्तहेरास मदत केल्याचे उघड, हेरगिरीत आरोपीला आतापर्यंत ११ लाख रुपयांचा फायदा
SHARES

भारत आणि चीनमध्ये दिवसेंदिवस संबध हे बिघडत असताना. चीनच्या कपटी वागणूकीचे अनेक चेहरे आता समोर आलेले आहेत. मुंबईच्या गुन्हे शाखेंच्या पोलिसांनी गोंवडीत बेकायदा टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी केलेल्या कारवाई चीनी सहकाऱ्यांकडूनच गोंवडीतील आरोपीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या हेरगिरीत आरोपीला आतापर्यंत ११ लाख रुपयांचा फायदा झाल्याचे कळते.

हेही वाचाः- भारतातील पहिल्या मोबाईल लॅबचं उद्घाटन, होणार अधिक चाचण्या

 मुंबईच्या गोवंडी परिसरातून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजद्वारे हे गुप्तहेर जम्मू काश्मिरमधल्या, आर्मीच्या हालचालींची माहिती द्याचया, तो प्रामुख्याने दुबई, पूच्छ आणि राजोरी परिसरातील माहिती या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने पाकिस्तानमध्ये पुरवायचा, मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील दोन क्रमांकाच्या सहाय्याने हे सर्व दूरध्वनी डायवर्ट करण्यात आले आहेत.  याबाबत जम्मू काश्मिर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कळवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १९१ सिम कार्ड असलेली टेलिफोन एक्सचेंज मशीन, लँपटाँप, मोबाइल आणि इतर साहित्य हस्तगत केली आहेत. या आरोपीचा ताबा आता 'एनआयए' तपाय यंञणेकडे सोपवण्यात आला होता. समीर अलवारी(३८) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्या संबंधीत इतर माहितीही घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय ठेऊन आहेत. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानकडून मागील आठ महिन्यांपासून ३० लाख दूरध्वनी करण्यात आले असून सरकारचा २० कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला असल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचाः- नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव

एका खासगी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या मदतीने तपास केला असता हे दूरध्वनी गोवंडी परिसरातून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोवंडी येथे छापा टाकून समीरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १९१ सीमकार्ड व पाच सीमबॉक्स हस्तगत करण्यात आले. याबाबत अधिक तपास केला असता आखाती देश व पाकिस्तानातून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशी दूरध्वनी अथवा व्हिओआयपी दूरध्वनी या बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून वळवले जातात. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्यांची नोंदही होत नव्हती. तसेच ज्या व्यक्तीला दूरध्वनी केले जातात त्याला भारतीय मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला असल्याचे वाटायचे. त्यामुळे या बेकायदा यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानी यंत्रणांनी भारतीय लष्करी तळांमधील माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का, याबाबत तपास सुरू आहे.

कसा करतात वापर

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमध्ये सिमबॉक्स इंटरनेट कनेक्शनला राउटरच्या माध्यमातून जोडले जातात आणि परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल राऊट करून भारतातील मोबाइल नंबर किंवा लॅण्डलाइनशी जोडले जातात. एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कॉलचे डोमॅस्टिक कॉलमध्ये रूपांतर केले जातात. हा फसवणुकीचा प्रकार असून भारताची कोणतीही सुरक्षा यंत्रणा हे आंतरराष्ट्रीय कॉल पकडू शकत नाही. डिओटीकडेही या कॉलची नोंद होत नसल्याने सरकारहि आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा