भूषण कुमार यांनी फेटाळले बलात्काराचे आरोप, टी-सीरिजकडून मोठा खुलासा

टी सीरिजनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,भूषण कुमार यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार पूर्णपणे खोटी आणि द्वेषपूर्ण आहे.

भूषण कुमार यांनी फेटाळले बलात्काराचे आरोप, टी-सीरिजकडून मोठा खुलासा
SHARES

गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-सीरिज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. आता याप्रकरणी टी सीरिजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

टी सीरिजनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भूषण कुमार यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार पूर्णपणे खोटी आणि द्वेषपूर्ण आहे. या आरोपाचं आम्ही खंडन करतो. नोकरी देण्याच्या बहाण्यानं २०१७ ते २०२०0 या कालावधीत या महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा चुकीचा आरोप करण्यात आला आहे. तिनं यापूर्वी फिल्म-म्युझिक व्हिडिओंमध्ये टी-सीरिज बॅनरसाठी काम केलं आहे ही नोंद करण्यासारखी बाब आहे.

मार्च २०२१ च्या सुमारास तिनं भूषणकुमार यांच्याशी संपर्क साधला होता. तिला आमच्या एका वेबसीरिजमध्ये काम करण्याची इच्छा होती. पण तिला त्यासाठी नकार देण्यात आला होता. त्यानंतर, जून २०२१ मध्ये महाराष्ट्रात लॉकडाउन उठवल्यानंतर तिनं तिच्या साथीदाराबरोबर खंडणीची रक्कम मागितली.

यामुळे, १ जुलै २०२१ रोजी अंबोली पोलिस ठाण्यात टी-सीरिजच्या बॅनरद्वारे खंडणीचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार दाखल केली गेली. पुरावे म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंगही तपास यंत्रणेला आम्ही देऊ. आम्ही खंडणी प्रकरणात तक्रार केली म्हणून तिनं ही तक्रार केली आहे. आम्ही यासंदर्भात आमच्या वकिलांशी सल्लामसलत करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असं स्पष्टीकरणच टी सीरिजकडून देण्यात आलं आहे.

भूषण कुमार यांच्यावर एका ३० वर्षीय महिलेनं चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. काम देण्याचं आमिष दाखवून भूषण कुमार यांनी २०१७ ते ऑगस्ट २०२० (३ वर्षे) पर्यंत अत्याचार केल्याचा या महिलेचा आरोप आहे.

२००१ साली भूषण कुमार यांनी 'तुम बिन' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. भूल भुलैया, आशिकी 2, सनम रे, ऑल इज वेल, सरबजीत, बादशाहो, तुम्हारी सुलु, भारत आणि सत्यमेव जयते अशा अनेक चित्रपटांची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.

भूषण कुमार बऱ्याच वेळा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. १३ फेब्रुवारी २००५ रोजी भूषण यांनी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या खोसला कुमारसोबत लग्न केले. दिव्या बर्‍याचदा तिचे म्युझिक व्हिडिओ आणि इतर प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते.हेही वाचा

केकमधून ड्रग्सची विक्री करणाऱ्या डाॅक्टरला अटक

प्रेमभंग झालेल्या तरूणीला लाखो रुपयांचा गंडा, बंगाली बाबाला अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा