सव्वा सात कोटींचा सीमाशुल्क बुडवला; व्यावसायिकाला अटक

२०१४ मध्ये बीआयएसच्या निकषापेक्षा कमी दर्जाच्या पोलाद आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोपीनं आयात करताना जाहीर केलेलं पोलाद हे विद्युत ट्रान्स्फॉर्मरसाठी वापरण्यात येतं. मात्र हे पोलाद कमी प्रतीचं असल्यास ट्रान्स्फॉर्मर लवकर खराब होतो.

सव्वा सात कोटींचा सीमाशुल्क बुडवला; व्यावसायिकाला अटक
SHARES

दर्जाहीन पोलाद उच्च प्रतीचं असल्याचं भासवून सीमाशुल्क विभागाची सव्वा सात कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं अटक केली आहे. नरेंद्र पुरोहित (२९) असं अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचं नाव आहे.

 

चामुंडा इंटरप्रायजेसवर कारवाई

भांडुप परिसरात राहणारा पुरोहित चामुंडा इंटरप्रायजेस नावानं कंपनी चालवतो.  मिळालेल्या माहितीवरून डीआरआयने पुरोहितच्या कार्यालयावर छापा टाकला असता स्वाक्षरी आणि शिक्का नसलेली कोरी मॅग्नेटिक चाचणीची प्रशस्तिपत्रकं आढळून आली. यावेळी आयात करण्यात आलेलं पोलाद तपासलं असता ते कमी प्रतीचं असल्याचं निष्पन्न झालं.


विद्युत ट्रान्स्फॉर्मरसाठी पोलाद

२०१४ मध्ये बीआयएसच्या निकषापेक्षा कमी दर्जाच्या पोलाद आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोपीनं आयात करताना जाहीर केलेलं पोलाद हे विद्युत ट्रान्स्फॉर्मरसाठी वापरण्यात येतं. मात्र हे पोलाद कमी प्रतीचं असल्यास ट्रान्स्फॉर्मर लवकर खराब होतो. निकषात बसणाऱ्या पोलादापासून बनलेले ट्रान्स्फॉर्मर २० वर्ष चालते. त्या तुलनेत या पोलादापासून बनवलेलं ट्रान्स्फॉर्मर तीन ते चार वर्ष चालतात, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.



हेही वाचा -

वडाळातून १० लाखांची बनावट दारू जप्त

निर्मात्याकडे २५ कोटींची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा