शिक्षिकेची विद्यार्थिनीला ४५० उठाबशा काढण्याची शिक्षा

गृहपाठ (home work) न केल्याने शिक्षिकेने (teacher) विद्यार्थिनी (student) ला ४५० उठाबशा काढण्याची शिक्षा (punishment) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

गृहपाठ (home work) न केल्याने शिक्षिकेने (teacher) विद्यार्थिनी (student) ला ४५० उठाबशा काढण्याची शिक्षा (punishment) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उठाबशा काढल्यामुळे मुलीची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पिडीत आठ वर्षीय मुलगी ठाणे (thane) येथील एका शाळेत तिसरीत शिकत आहे. तिने आपला गृहपाठ (home work) पुर्ण न केल्याने  शिक्षिकेने  (teacher) तिला ४५० उठाबशा काढण्याची शिक्षा (punishment) दिली. या शिक्षिकेचं नाव लता असल्याचं मुलीच्या आईने पोलिसांना (police) सांगितलं आहे. एवढ्या उठाबशा काढल्यामुळे मुलीची तब्येत बिघडली आहे. तिला उपचारासाठी ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या शिक्षिकेने मागील महिन्यात मुलीला  गृहपाठ केला नव्हता म्हणून तिचे कपडे काढून तिला वेताच्या काठीने मारले होते.

पिडीत मुलगी शांतिनगरमधील मीरा रोड परिसरात राहते. ट्युशनवरुन घरी आली तेव्हा तिच्या आईने पाहिले असता मुलीला नीट चालता येत नसल्याचे दिसून आले. तसेच मुलीचे दोन्ही पाय सुजले होते. यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईने तक्रार दाखल करताना सांगितलं की, गेल्या महिन्यातही याच शिक्षिकेने मुलीली वेताच्या काठीने मारले होते. तेव्हा तिच्या पायांचा सूज आली होती. याबाबत शिक्षिकेला मुलीच्या आईने विचारले असता तिने संताप व्यक्त केला. होता. 


हेही वाचा -

'सनबर्न फेस्टिव्हल'च्या कटातील मुख्य आरोपीस अटक

अश्लिल व्हिडीओ शिक्षकांच्या ग्रुपवर टाकणारा शिक्षक निलंबित
संबंधित विषय
ताज्या बातम्या