ठाण्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आग लावणाऱ्याला अटक

ठाण्यातील विद्युत विभागाच्या कार्यालयात लागलेल्या आगीप्रकरणी एका ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ठाण्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आग लावणाऱ्याला अटक
SHARES

ठाण्यातील विद्युत विभागाच्या कार्यालयात लागलेल्या आगीप्रकरणी एका ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वागळे इस्टेट परिसरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या (एमएसईडीसीएल) कार्यालयाला ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं अशी माहिती दिली की, लक्ष्मण राखुंडे असं या आरोपीचं नाव आहे. महावितरण कार्यालयाजवळील कचरा त्यानं गोळा केला आणि तो जाळला. नंतर, त्यानं जळता कचरा कार्यालयाच्या आवारात फेकला. ज्यामुळे फर्निचर आणि कार्यालयातील महत्त्वाचं कागदपत्र जळाली.

तपासणी दरम्यान असं आढळलं की, रखुंडे यांनी मध्यरात्री महावितरणच्या केंद्राजवळील कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वीज कंपनीच्या कार्यालयातील चौकीदारानं त्याला पकडलं होतं. याचा त्याला राग आला होता आणि त्यानं कार्यालयाला आग लावून सूड घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. या फुटेजमध्ये एक लंगडा माणूस जबरदस्तीनं घटनास्थळावरून पळत सुटला असल्याचं पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. पोलिसांनी आयपीसी कलम ४३६ अन्वये त्याला अटक केली आहे.



हेही वाचा

हळदी कार्यक्रमातूनच ड्रग्ज पॅडलरला उचललं, एनसीबीची कारवाई

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा