लॉकडाऊन मध्ये अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून 9 कोटींचा दंड वसूल


लॉकडाऊन मध्ये अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून 9 कोटींचा दंड वसूल
SHARES
लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी मुंबईत दोन लाख 9 हजार चालान जारी करण्यात आले आहेत. त्यात साडे नऊ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यात विना हेल्मेट प्रवास करणा-या दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधीक आहे. हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालवणे, चुकीच्या मार्गीकेवरून गाडी चालवणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, चालक परवान्याशिवाय गाडी चालवणे आदी विविध प्रकरणांमध्ये हे चालान वाहतुक पोलिसांनी जारी केले आहेत. 

विना हेल्मेट दुचाकी चालवण्याप्रकरणी 73 हजार 735 चालान, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 36 हजार 248 चालान, अधिकृत परवाना सादर न केल्याप्रकरणी11 हजार 611 चालान, विना चालक परवाना गाडी चालवल्याप्रकरणी 6 हजार 354 चालान जारी करण्यात आले आहेत. असे एकूण दोन लाख 9 हजार 18 चालान लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी जारी करण्यात आले आहेत. त्यातील दंडाची रक्कम 9कोटी 43 लाख 46 हजार 200 रुपये एवढी आहे. पोलिसांनी अवैध रित्या धंदा करणाऱ्या टँक्सी आणि रिक्षा चालकांवर एप्रिल  1 ते 30 एप्रिल दरम्यान 647 खासगी सामान पोहचवणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 98 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर प्रवाशांना घेऊन धंदा करणाऱ्या 18 हजार 640 रिक्षाचालकांवर कारवाई करत, 62 लाख 60 हजार 700 दंड वसूल केला आहे.

याशिवाय वाहतुक पोलिसांनी बेकायदेशीररित्या फिरणा-या रिक्षा, टॅक्सींवरही मोठी कारवाई केली आहे. 4 मार्च ते 11 मे दरम्यान  पोलिसांनी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यावर  दोन वेगवेगळ्या स्वरुपाच्या कारवाई केल्या आहेत. त्यातील पहिली कारवाईत प्रवाशी घेऊन जाणे आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याचे सामान पोहचवणे. पोलिसांनी प्रवाशांना घेऊन अवैध वाहतूक केल्याप्रकरणी 14 हजार 810 जणांवर ई-चलानद्वारे कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी या बेशिस्तंाकडून  55 लाख 71 हजारांचा दंड आकारला आहे. तर खासगी सामानांची ने-आण करणाऱ्या 589 रिक्षा चालकांवर करत 2लाख 62 हजार 800 करत त्यांच्याजवळून दंड आकारण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुंबईत अवैधरित्या भाडी घेणा-या 3 हजार 368 टॅक्सी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या टॅक्सी चालकांकडून पोलिसांनी 12 लाख 36 हजार 500 रुपयांचा दंड आकारला आहे. तर अनेकदा कारवाई करून ही न ऐकणारे आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या  339 रिक्षा आणि 61 टॅक्सी चालकांच्या टॅक्सी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा