राऊतकडे आलेल्या संशयित रकमेचा माग ईडी घेणार


राऊतकडे आलेल्या संशयित रकमेचा माग ईडी घेणार
SHARES

पीएमसी बँक गैरव्यवहार आरोपी प्रवीण राऊत याच्याशी संबंधीत ७२ कोटींची मालमत्तेवर सक्त वसुली संचलनालयाने टाच आणल्यानंतर उर्वरीत रकमेचा माग घेण्यावर तपास ईडीचा केंद्रीत झाला आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः- मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

पीएमसी बँकेतील ४३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भादंवि कलम ४०९, ४२० ४६५, ४६६, ४७१, व १२० (ब) अंतर्गत एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील ९५ कोटी एचडीआयएलच्या मार्फत प्रवीण राऊतने इतर ठिकाणी वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहाराचे कोणतेही कागदपत्रे करण्यात आलेली नाहीत.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, रकमेच्या माध्यमातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहाराती एक कोटी ६० लाख प्रवीणने त्याची पत्नी माधुरी राऊतला दिले होते. त्यातील ५५ लाख रुपये(२३ डिसेंबर, २०१० ला ५० लाख व १५ मार्च २०११ ला पाच लाख रुपये) विनाव्याज कर्ज म्हणून शिवसेने नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते.

हेही वाचाः- मुंबईतील चार रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होणार

 याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागिदार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. तेथे केवळ पाच हजार ६२५ रुपयांचे योगदान असताना त्यांना १२ लाख रुपये ओव्हरड्रॉन कॅपिटलच्या रुपाने मिळाले होते. पुढे ते कर्जांत रुपांतरीत झाले. या  दोन व्यवहारांबाबत वर्षा राऊत यांना प्रश्न विचारण्यात येणार आहे. मूळ तपास हा प्रवीण राऊत याच्या गुंतवणीकीबाबत सुरू आहे. या रकमेची आरोपी प्रवीण राऊतने कोठे गुंतवणूक केली. याबाबत सध्या तपास सुरू असल्याचे अधिका-याने सांगितले. यापूर्वी याप्रकरणी राकेश वाधवान व वाधवान कुटुंबियांशी संबंधीत २९३ कोटी रुपयांची मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. तसेच ६३ कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा