TRP Scam: फक्त मराठी चॅनलच्या मालकाला दिलासा, न्यायालयाने केला जामीन मंजूर

फक्त मराठी चॅनेलचा टिआरपी अकस्मिक वाढलेली नसून चॅनेलच्या उत्पन्नात देखील वाढ झाली नसल्याचा युक्तिवाद निकम यांनी केला.

TRP Scam: फक्त मराठी चॅनलच्या मालकाला दिलासा, न्यायालयाने केला जामीन मंजूर
SHARES

फेक टिआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून सखोल तपास सुरू असताना. या प्रकरणातील दोषी फक्त मराठीचे मालक शिरिष पतनशेट्टी याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर त्याची सुटका न्यायालयाने करण्यास परवानगी दिली. फक्त मराठीच्यावतीने अँड अनिकेत निकम यांनी टीआरपी प्रकरणात फक्त मराठी चॅनेलचा टिआरपी अकस्मिक वाढलेली नसून चॅनेलच्या उत्पन्नात देखील वाढ झाली नसल्याचा युक्तिवाद निकम यांनी केला.

हेही वाचाः- अखेर १० महिन्यांनंतर मुंबईच्या वेशींवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित

खोट्या टिआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी या पूर्वीच फक्त मराठी, बाँक्स मिडिया आणि रिपब्लिक भारत यांच्यावर गंभीर आरोप करत आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. त्यात हंसाचे दोन कर्मचारी आणि फक्त मराठी आणि बाँक्स मिडिया या दोन चॅनेलच्या मालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामधील आरोपी बोमापल्ली मिस्री याच्याकडे गेल्या एका वर्षापासून १ कोटींहून अधिक रक्कम चार-पाच जणांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केल्याची गोष्ट उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मिस्री (४५) याला गेल्या दीड वर्षांपासून एकाच मार्गाने उत्पन्न येत नव्हते. तर मिस्री याच्या कुटुंबातील लोकांना तीन चॅनल्स पाहण्याचे पैसे दिले गेले होते. मिस्री याच्या बँक लॉकरमधून ८.५ लाख रुपये मिळाले असून त्याचे खाते फ्रिज करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तपासात आरोपी विशाल भंडारी याच्या घरातूनही गुन्हे शाखेने एक डायरी हस्तगत केली आहे ज्यामध्ये बॅरोमिटर आणि चॅनेल्सची नाव आणि ट्राजेक्शनच्या नोंदी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आलेल्या तीन चॅनेल्सपेक्षा जास्त चॅनल्सची नाव समोर आली आहेत. त्यानुसार लोकांना पैसे द्यायचे आहेत अशी नोंद आरोपी विशालने त्याच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली आहेत. तर विशालने त्याच्या डायरीमध्ये १८०० घरांचे डिटेल्स ठेवले आहेत. ज्यामध्ये बॅरोमीटर्स बसवण्यात आले आहेत.

हेही वाचाः-मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा

मात्र पोलिसांनी केलेल्या आऱोपाचे खंडन करत, फक्त मराठीचे वकील अँड अनिकेत निकम यांनी पोलिसांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. चॅनेलने टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिल्याबाबत कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. या युक्तीवादावर न्यायालयाने शिरीष याचा जामीन जरी मंजूर केला असला. तरी तपासाला सहकार्य करणे, साक्षी पुरावे प्रभावित न करणे अशा अटींचे हमीपत्रही लिहून घेतलेले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा