सहकाऱ्यांना अडकवण्यासाठी पोलिसाने रचला कट, महिलेला द्यायला लावली खोटी बलात्काराची तक्रार

तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता ११ जानेवारीला आरोपींपैकी एक पोलिस तपासासाठी गुजरातमध्ये होता. तसेच दुसरी घटना घडली, त्यावेळी म्हणजे १५ जानेवारीला दोन आरोपी पोलिस पोलिस ठाण्यात उपस्थित होते.

सहकाऱ्यांना अडकवण्यासाठी पोलिसाने रचला कट, महिलेला द्यायला लावली खोटी बलात्काराची तक्रार
SHARES

घाटकोपरमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाच्या निलंबनासाठी दोन पोलिस शिपाई जबाबदार असल्याच्या रागातून अधिकाऱ्याने त्या दोघांना अडकवण्याचा कटर रचला. त्यासाठी एका महिलेला त्या दोन पोलिसांवर बलात्कार केल्याचा खोटा आरोप करण्यास सांगत दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यास सांगितले. मात्र पोलिस तपासात या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आली आणि खोटी तक्रार दिल्या प्रकरणी महिलेला अखेर पोलिसांनी अटक केली.

हेही वाचाः-स्वयंसेवकांना लस चाचणीवेळी मृत्यू झाल्यास मिळणार १ कोटी

जानेवारी महिन्यात ही घटना घडली असून याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दोन पोलिसांसह एक खबरी महिला व इतर आरोपी महिलेच्या घरी आले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिचा गर्भपात झाला. बलात्काराचा प्रतिकार करणा-या या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारी बद्दल संशय आल्यामुळे पोलिस उपायुक्त(परिमंडळ-७) प्रशांत कदम यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता ११ जानेवारीला आरोपींपैकी एक पोलिस तपासासाठी गुजरातमध्ये होता. तसेच दुसरी घटना घडली, त्यावेळी म्हणजे १५ जानेवारीला दोन आरोपी पोलिस पोलिस ठाण्यात उपस्थित होते.

हेही वाचाः- ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी

या महिलेच्या मोबाईलची माहिती घेतली असता ही महिला एका उपनिरीक्षकाच्या संपर्कात होती. या पोलिस उपनिरीक्षकाविरोधात दाखल एका प्रकरणामुळे त्याला निलंबीत करण्यात आले होते. त्यासाठी हे दोन पोलिस जबाबदार असल्याचे ठरवून पोलिस उपनिरीक्षकाने हा कट रचला होता. याप्रकरणी १२०(ब) अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा दाखल करून बलात्काराची तक्रार करणा-या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिस सध्या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा शोध घेत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा