बांगलादेशींचा प्रश्न ऐरणीवर, एटीएसच्या पथकाने केला पर्दाफाश

. त्यात एकूण ८५ बांगलादेशींना त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसवल्याचा उलघडा झाला आहे.

बांगलादेशींचा प्रश्न ऐरणीवर, एटीएसच्या पथकाने केला पर्दाफाश
SHARES

मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या टोळीचा मुंबईच्या एटीएस विभागाने पर्दापाश केला आहे. ही टोळी बांगलादेशींना भारतात वास्तव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करित असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) काळाचौकी पोलिसांनी चार जणांना या प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले असून त्यासाठी लागणारी कागदपत्रे रबर स्टॅम्प , बँकेचे पासबुक, वानचालक परवाना आदी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचाः- कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

बांगलादेशी घुसखोर ही देशासाठी मोठी समस्या असून गेल्या काही वर्षांत मुंबईत त्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे. अशाच बेकायदेशीर भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती एटीएसच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी कारवाई करत अक्रम शेख या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी शिवडी स्मशानभूमीतून ताब्यात घेतले. अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख (२८) हा बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडीस आले. त्याच्या चौकशीतून नूर नबी याला भारतात वास्तव्य करता यावे म्हणून कौसा, मुंब्रा येथे राहणा-या मोहम्मद रफीक रेहेमतुल्ला सय्यद (४२) याने आधार कार्ड, पॅन कार्ड व भारतीय पारपत्र बनवून दिल्याचे सांगितले.

हेही वाचाः- प्रभादेवीमध्ये गॅस गळतीच्या दोन तक्रारी, स्थानिक हादरले

 या माहितीवरून एटीएसने सय्यद याला मुंब्रा येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो २०१३ पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करीत असून त्याने आॅनलाईन पद्धतीने सादर केलेल्या पारपत्राची माहिती मिळवली असता सय्यद याने एकूण ४४६ लोकांना पासपोर्ट काढून दिल्याचे उघड झाले. त्यात एकूण ८५ बांगलादेशींना त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसवल्याचा उलघडा झाला आहे. भरतीय ओळखपत्रे बनवण्यासाठी सय्यद बनावट कागदपत्रे तयार करीत होता. या बनावट कागपत्रे, रबर स्टॅम्प व इतर बाबी पुरवण्याचे काम इद्रीस मोहम्मद शेख (५६), अविन गंगाधर केदारे (३५), नितीन राजाराम निकम (४३) हे करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने त्यांनी या प्रकरणात अटक केली. त्याचबरोबर सोहेल अब्दुल सुभान शेख (३३), अब्दुलखैर शेख (४२) व अब्दुल काशम शेख (२६) या बांगलादेशींनादेखीलअटक करण्यात आली आहे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा