बकऱ्याच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघांना अटक

अचानक एका बकऱ्याने येऊन त्याच्या छातीत जोरदार धडक दिली. त्यानंतर सिरताज जागीच बेशुद्ध झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेले. तेथून त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले.

SHARE

मुंबईच्या घाटकोपर परिसरात एका बकऱ्याच्या धडकेत १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात घडलेल्या या प्रकारणी आता बकऱ्याला परिसरात मोकाट सोडणाऱ्या दोघांविरोधात पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. युनूस खान, महोम्मद जलील रेहमान अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


ह्रदयाला गंभीर दुखापत

विक्रोळीच्या इस्लामपुर परिसरात राहणारा सिरताज लियातक शेख (१३) हा २९ एप्रिल रोजी परिसरात फिरत होता. यावेळी अचानक एका बकऱ्याने येऊन त्याच्या छातीत जोरदार धडक दिली. त्यानंतर सिरताज जागीच बेशुद्ध झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेले. तेथून त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात ह्रदयाला गंभीर दुखापत झाल्यामुळे सिरताजचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सिरताजच्या कुटुंबियांनी पार्कसाईट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून खान, रेहमान या दोघांना पोलिसांनी ३०४ () नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.हेही वाचा -

दादरमधील पोलीस वसाहतीत आग, १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

तरुणीशी अश्लील चाळे, रोडरोमियोसह पोलिसालाही अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या