दुप्पट पैशाचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

भांडुप परिसरात चारही आरोपींनी काही महिन्यांपूर्वी केजीएन असोसिएशन या नावाने कंपनी बनवली होती. या कंपनीद्वारे त्यांनी दहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

SHARE

दहा महिन्यात पैसे दुप्पट देण्याचं आमीष दाखवून राज्यातील हजारो नागरिकांना कोट्यावधी रुपयांना गंडवण्यात आल्याची घटना भांडुपमध्ये घडली आहे. या प्रकरणी नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी हरूण शेख याला अटक करण्यात आली आहे.

 भांडुप परिसरात चारही आरोपींनी काही महिन्यांपूर्वी केजीएन असोसिएशन या नावाने कंपनी बनवली होती. या कंपनीद्वारे त्यांनी दहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आश्वासन दिलं होतं.  त्यानुसार दोन हजारहून अधिक जणांनी या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र कंपनीकडून दिलेल्या वेळेत परतावा न मिळाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत गेला. त्यातूनच काही जणांनी भांडुप पोलिस ठाण्यात हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी हरुण शेख याला सोमवारी अटक करून मुलुंड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हरुण शेख याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  आरोपी हारून शेख हा रिक्षा चालवत असताना भीशीद्वारे गुंतवणूक करायचा. यादरम्यान त्याने पाच वर्षांपूर्वी केजीएन असोसिएशन ही कंपनी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात सुरू केली. दहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याच्या अमिषापोटी अनेकांनी या कंपनीत लाखोंची गुंतवणूक केली.हेही वाचा - 

गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

दुर्मिळ मगरींची तस्करी करणारे अटकेत
संबंधित विषय
ताज्या बातम्या