दुर्मिळ मगरींची तस्करी करणारे अटकेत

मुंबईच्या पश्चिम द्रूतगती मार्गावरून एका बसमध्ये छुप्या पद्धतीने दुर्मिळ मगरींची तस्करी केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपालांच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

SHARE

मुंबईतून खासगी बसमधून दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या तिघा जणांना वनक्षेत्रपालच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद अब्दुल रहिम हाफिज (३३),खुद्दस बैग (३८), छत्रपती उर्फ शिवाजी जी बालाया (२८) अशी या आरोपींची नावे आहेत. दक्षिण भारतातून या मगरी आणल्या असून मुंबईत त्यांची विक्री केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपालाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मुंबईच्या पश्चिम द्रूतगती मार्गावरून एका बसमध्ये छुप्या पद्धतीने दुर्मिळ मगरींची तस्करी केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपालांच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनक्षेत्रपालांच्या अधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी MH-12 QW 6917 क्रमांकाच्या बसला थांबवले. त्यावेळी बसच्या डिकीत एका बाॅक्समध्ये ठेवलेल्या पिंजऱ्यात दोन दुर्मिळ मगरी जिवंत आढळल्या. काही हजारांना या मगरीची तस्करी केली जात होती.  तिघांनी या तस्करीची कबूली दिली आहे. या प्रकरणी तिघांवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कलम २,९,३९,४४,४८,५१नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे तिघेही या मगरीची तस्करी कुणाला करणार होते याचा आता तपास सुरू आहे.   हेही वाचा -

गोवंडीत अल्पवयीन विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या