अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याप्रकरणी तिघे गजाआड

  MAHIM
  अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याप्रकरणी तिघे गजाआड
  मुंबई  -  

  माहीम येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका 35 वर्षीय टॅक्सी चालकासोबत लग्न लावून दिल्याप्रकरणी काझी, आई आणि पतीला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पती आसिफ खान (35), काजी अहमद रज्जा शेख (37) यांचा समावेश आहे.

  अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईसह माहीम परिसरात राहते. घरची परिस्थिती हालाखीची असल्याचं सांगत आईने मुलीचे 35 वर्षांच्या टॅक्सीचालकासह बळजबरीने लग्न लावले होते. तिथे होणाऱ्या शारीरिक त्रासाला कंटाळून मुलीने तेथून पळ काढला अणि मुंब्रा येथील तिच्या आजीचे घर गाठले. अशावेळी तिच्या पतीने ही बाब मुलीच्या आईला सांगितली.

  त्यानंतर या निर्दयी आईने तिला पती आसिफच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने जाण्यास नकार दिला. मुलीने आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली असता शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेऊन तिघांना अटक केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.