बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तिघे ताब्यात

नमाज पडण्यासाठी जात असलेल्या विकासकाची रस्त्यात अज्ञातांनी चाकूने वार करून केली हत्या

बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तिघे ताब्यात
SHARES

मुंबईच्या जुहू परिसरात पहाटे ६ वा. नमाज पडण्यासाठी जात असलेल्या विकासकाची रस्त्यात अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली. या हत्ये प्रकरणी जुहू  पोलसांनी तीन संशयितांना ताब्या घेतल्याचे कळते. अब्दुल रेहमान अब्दुल लतीफ शेख उर्फ सोनू असे या संशयिताचे नाव आहे. तर हल्लेखोर नदीम हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  आर्थिक व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 हेही वाचाः-  मुंबईत मुसळधार पावसामुळं पाणी साचण्याची शक्यता

अंधेरीच्या सोफी हाऊस, गुलमोहर क्राँस रोड परिसरात राहणारे विकासक अब्दुल नुनाफ शेख (५५) हे सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास इर्ला मस्जिद येथे नमाज पठन करण्यासाठी एकटेत जात होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी संधी साधून शेख यांच्यावर जिवघेणा हल्ला केला आणि पळ काढला. शेख यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेहण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुहू पोलिस आणि गुन्हे शाखा ९ चे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातही खळबळ उडाली होती. तपासात असे पुढे आले की, ज्या मस्जिदमध्ये शेख नमाज पडायला जात होता. त्या मस्जिदमधील ट्रस्टचा शेख हा मेंबर होता.

 हेही वाचाः- Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

शेख हे नेहमी घराबाहेर पडायचा त्यावेळी त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक असायचा, मात्र सोमवारी शेख हे घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत कुणी नव्हते. नेमकं याच संधीचा फायदा घेऊन आरोपी नदीमने मागून येऊन त्याचा गळा चीरला. घटनास्थळाहून पोलिसांनी सीसीटिव्ही ताब्यात घेतले आहेत. त्यात संशयित मारेकरी चेहरा लपवण्याच्या हेतून टोपी घालून जात असल्याचे दिसून आले आहे. शेख हे मुंबईतील नामकिंत विकासकांपैकी एक होते. सध्या त्यांचा एका ठिकाणी एसआरएचा प्रोजेक्टही सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. शेख यांच्या हत्येमागे त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा