३ तोतया पोलिसांना भोईवाडा पोलिसांनी केली अटक

तिघांनी कामत यांना पोलिस असल्याची बतावणी करून गुन्ह्यात आत टाकण्याची धमकी दिली. तसंच अटक न व्हावी यासाठी दंड म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितली. हातात पैसे नसल्यामुळे कामत यांनी घाबरून एटीएम कार्ड आरोपींकडे देत, त्यांना पीन नंबरही दिला.

SHARE

पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडणाऱ्या तीन भामट्यांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. राकेश रत्नाकर शेजवळ (२७), चंद्रकांत रामा गोलार (३४), मिथुन संतोष चव्हाण (२८) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


३० हजार लुबाडले

मूळचे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगचे राहणारे बिन्देस्वर कामत (६५) हे टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आले आहेत.  मुंबईत कुणीही नातेवाईक नसल्यामुळे रुग्णालयाबाहेरील पदपथावर ते पत्नीसोबत राहतात. सोमवारी कामत रुग्णालय परिसरात वावरत असताना राकेश रत्नाकर शेजवळ, चंद्रकांत रामा गोलार, मिथुन संतोश चव्हाण या तिघांनी त्यांना गाठले.  तिघांनी कामत यांना पोलिस असल्याची बतावणी करून गुन्ह्यात आत टाकण्याची धमकी दिली. तसंच अटक न व्हावी यासाठी दंड म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितली. हातात पैसे नसल्यामुळे कामत यांनी घाबरून एटीएम कार्ड आरोपींकडे देत, त्यांना पीन नंबरही दिला. त्यानंतर एका आरोपीने आर.एम.भट्ट हायस्कूलच्या गल्लीतील एटीएममधून ३० हजार रुपयेे काढूूून एटीएम कार्ड पुन्हा कामत यांच्याजवळ देेऊन पळ काढला. 


रंगेहात पकडले

घडलेल्या प्रकाराची माहिती कामत यांनी त्यांच्या पत्नीला दिली. मात्र पोलिस कारवाई करतात मग त्याची पावतीही देतात. कामत यांना फसवण्यात आल्याचं तिच्या लक्षात आल्यानंतर तिने कामत यांना घेऊन पोलिस ठाणे गाठत तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान मंगळवारी हे तिघे पुन्हा कुठल्यातरी वृद्ध आजारी माणसाला लक्ष्य करण्यासाठी आले असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकेश ढगे, पोलिस शिपाई जीवन मोपारी, चिराग तडवी आणि मनोज पाटील यांंनी तिन्ही आरोपींना रंगेहात पकडले.  या तिघांकडून पोलिसांनी फसवणुकीचे ३० हजार रुपये हस्तगत केले आहेत. हेही वाचा -

पत्नीची हत्या करून पतीचे पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण

सरकारची १२० कोटी रुपयांची फसवणूक, ३ व्यापाऱ्यांना अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या