मालाड टोईंग प्रकरण - महिलेचं पितळ उघडं


SHARE

मालाड येथे गाडीत महिला स्तनपान करत असताना गाडी टो केल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर आता या घटनेची दुसरी बाजू दाखवणारा व्ही़डिओ समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. ज्या वेळी गाडी प्रत्यक्षात टो केली जात होती, त्या वेळी महिलेचं बाळ हे तिच्या नवऱ्याच्या हातात असल्याचं या दुसऱ्या व्हिडिओतून उघड झालं आहे. गाडी टो करण्यास सूरुवात केली, तेव्हा बाळ महिलेच्या हातात देण्यात आल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे.
काय होता प्रकार?

शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक महिला गाडीत लहान मुलाला स्तनपान करत असताना गाडी टो होत असल्याचं दिसत होतं. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेताच तात्काळ चौकशी करुन व्हिडिओत दिसणाऱ्या ट्रॅफीक हवालदार शशांक राणे यांना निलंबित करण्यात आले होते.


काय आहे सत्य?

शुक्रवारी मालाड एस. व्ही. रोडवर ट्रॅफीक पोलीस हवालदार शशांक राणे यांनी नो पार्किंगमध्ये उभी एस एक्स फोर गाडी पकडली. गाडी टो करता करता कार मालक आणि त्याची पत्नी राखी माळी तिथे आले. राखीसोबत ८ महिन्यांचं मूल देखील होतं. आपली गाडी उचलू नये म्हणून दोघांनी शशांक राणे यांच्याशी बरीच हुज्जत घातली. महिलेचा नवरा घटनास्थळावरून फेसबुक लाईव्ह करून देखील मोकळा झाला. तब्बल अर्धा तास हा ड्रामा सूरू होता. यादरम्यान शशांक राणेंनी दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, शेवटी राणे यांनी स्थानिक पोलिसांची मदत मागितली.


राखी माळीचा आडमुठेपणा

पोलिस आले, तरी राखी आपल्या आडमुठेपणावर कायम होती आणि शेवटपर्यंत गाडीतून खाली उतरली नाही. एवढंच नाही, तर राखी माळीने नवऱ्याच्या हातातील बाळालाही आपल्या हातात घेतले. शेवटी गाडी मालाड पोलीस ठाण्यात नेण्याचे ठरले. गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जाताना राखी माळीने गाडीतच बसणे पसंत केले. आणि जशी गाडी टो करण्यास सुरुवात झाली, तसा महिलेने आपल्या बाळाला हातात धरत कांगावा सुरू केला.

'या प्रकरणाला महिला देखील जबाबदार असून गाडी टो केली जात असताना तिने मुलाला गाडीत बसवणे चुकीचे आहे. त्यामुळे महिलेवर देखील कारवाई करावी,' अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे.हेही वाचा

अंधेरीत भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग


संबंधित विषय