IPS अधिकारी बनवण्याच्या नावाखाली लावला ३ कोटींचा चूना

पंजाबमध्ये नवोदितांना IPS आणि IAS ची खोटी स्वप्न दाखवून त्यांना लुबाडण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका दांपत्याचा पर्दाफाश केला आहे.

IPS अधिकारी बनवण्याच्या नावाखाली लावला ३ कोटींचा चूना
SHARES

आपला मुलगा IPS  किंवा  IAS व्हावा असे स्वप्न प्रत्येक पालकाचे असतं.  इथंपर्यंत पोहचण्यासाठी अनेक मुलं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस अभ्यास करत असतात. त्यामुळे स्वाभाविक आहे. या मुक्कामापर्यंत पोहचणे इतक सोपं नाही. मात्र पंजाबमध्ये नवोदितांना IPS आणि IAS ची खोटी स्वप्न दाखवून त्यांना लुबाडण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका दांपत्याचा पर्दाफाश केला आहे.

हेही वाचाः-  स्वयंसेवकांना लस चाचणीवेळी मृत्यू झाल्यास मिळणार १ कोटी

पुनीत कृष्णकुमार रलहान(२६) व सपना पुनीत रलहान अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघांनाही जोगेश्वरी येथील ओशिवरा परिसरातील घरातून गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांनी अटक केली. त्यांना जालंधर पोलिसांच्या विशेष पथकाच्या स्वाधीन देण्यात आले आहे. आरोपींनी अनेकांना अशा पद्धतीने फसवणल्याचा संश आहे. त्यांच्याविरोधात जालंधर शहरातील डीविजन ३ पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पंजाब पोलिस दलात उपअधिक्षक व दिल्ली पोलिस दलात आयपीएस अधिकारी बनवण्याचे आमीष दाखवून अनेकांकडून पैसे घेतले होते. त्या बदल्यात आरोपींनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स व नॅशनल पोलिस अकादमी, हैद्राबाद नावाने बनावट पत्र दिले होते. जालंधर पोलिसांच्या विशेष पथकाच्या तपासात आरोपी मुंबईत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली असता कक्ष १० च्या पोलिस पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा