कॉमेडियन कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी सुमोनाच्या वडिलांवर हल्ला


कॉमेडियन कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी सुमोनाच्या वडिलांवर हल्ला
SHARES

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याची ऑनस्क्रिन पत्नी सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांवर एका रिक्षाचालकाने हल्ला केला आहे. ज्यामध्ये सुमोनाचे वडील जखमी झाले आहेत. तिच्या वडिलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरोधात सुमोनाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच घडलेला हा प्रकार आता समोर आला आहे.


नेमका काय आहे हा प्रकार?

मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सुमोनाच्या वडिलांना रुग्णालयात जायचे होते. त्यासाठी त्यांनी रिक्षा थांबवली. पण त्या रिक्षाचालकाने त्यांना रिक्षात बसवण्याऐवजी रुग्णालयात जायचे असेल, तर जास्त पैसे मोजावे लागतील, असा दम दिला. यावरून रिक्षाचालक आणि सुमोनाच्या वडिलांमध्ये बाचाबाची झाली. याचदरम्यान रिक्षाचालकाने त्यांना धक्का देत पळ काढला. या हल्ल्यात सुमोनाचे वडील खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील होती. त्यांनी एका गाडीचालकाच्या मदतीने आपल्या पतीला रुग्णालायत दाखल केले.

रुग्णालयाने या संदर्भाची माहिती पवई पोलिसांना दिली. पवई पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेत आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. सध्या पोलिसांनी त्या रिक्षाचालकाचा शोध लावला असून त्याचे नाव अमित गुप्ता (25) असे आहे. पोलिसांनी गुप्ताला 6 ऑक्टोबरला त्याच्या घरातून अटक केली.


आरोपीची अटक आणि सुटका

पवई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता याच्यावर कलम 324, 506 मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण नंतर 5000 रुपयांच्या जातमुचलक्यावर गुप्ताची सुटका करण्यात आली.



हेही वाचा

कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेंड?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा