फेरीवाला हत्याप्रकरणी दोघांना अटक

भांडुपच्या झकेरिया कंपाऊडमध्ये भाजीची गाडी लावण्याच्या वादातून वडिलांसह दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. आमिर कुरेशी आणि कासिम कुरेशी अशी या आरोपींची नावे आहेत.

फेरीवाला हत्याप्रकरणी दोघांना अटक
SHARES

भांडुपच्या झकेरिया कंपाऊडमध्ये भाजीची गाडी लावण्याच्या वादातून वडिलांसह दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. 

आमिर कुरेशी आणि कासिम कुरेशी अशी या आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.


काय आहे प्रकरण?

घरासमोर भाजीची गाडी लावण्यावरून तीन आरोपींचा भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे गुलाम अब्दुल अली खान (५०) आणि त्यांची दोन मुलं सैबाज (२५) व शादाब खान (१५) यांच्याशी वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी अब्दुलसह सैबाज आणि शादाब हे झकेरिया मस्जिद इथं भाजीची गाडी लावण्यासाठी आले असताना तिन्ही आरोपींनी त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघा जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.


'अशी' केली अटक

तिन्ही आरोपी एकमेकांचे नातेवाई असून तिघेही अंमली पदार्थांची नशा करणारे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी आमिर आणि कुरेशी यांच्या घराची तपासणी केली असता, तिघेही फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आपली पथकं त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी पाठवली.

घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला त्याच दिवशी ताब्यात घेतलं. मात्र आमिर आणि कासीम हे दोन आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान पोलिसांना सीसीटिव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने दोन्ही फरार आरोपी गोवंडीत लपून बसल्याची माहिती मिळाली, त्यानुसार बुधवारी रात्री आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र आरोपींना नेमकं कुठून अटक करण्यात आली, याचा अधिकृत खुलासा पोलिसांनी केलेला नाही.



हेही वाचा-

कर्जबाजारी व्यावसायिकाने केला कुटुंबियांच्या हत्येचा प्रयत्न

माता न तू वैरिणी ! मस्तीखोर मुलीची आईनेच केली हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा