पार्किंगवरून शिवडीत 2 सख्ख्या भावांची हत्या

दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आल्याची घटना शिवडी येथे घडली आहे.

पार्किंगवरून शिवडीत 2 सख्ख्या भावांची हत्या
SHARES

दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आल्याची घटना शिवडी येथे घडली आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी रात्री ही घटना घडली. शिवडीतील हनुमान रोडवरील चाळीत पटेल आणि शेख कुटुंब शेजारी राहतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री दुचाकी पार्क करण्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार वाद झाला. या वादाचं पर्यावसन हाणामारीत झाले. शेख कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात शाहिद रजाक पटेल (२०), साहिल रजाक पटेल (१६) आणि अदनान पटेल हे तिघे जखमी झाले. त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान शाहिद आणि साहिल यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शेख कुटुंबातील करीम युसूफ शेख (35), युसूफ उमर शेख (70), मिनाज युसूफ शेख (35), मेहराज युसूफ शेख (65) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हेही वाचा -

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा