एम्फेटामाईन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; १५ कोटींचं ड्रग्ज हस्तगत

दोघांच्या अंगझडतीत आणि बँगेत पोलिसांना काहीही आढळून आले नाही. मात्र दोघे ही तितकेच गोंधळलेले होते. दोघांजवळील सामान ही तपासले मात्र त्यात ही काही आढळून येत नव्हते. अखेर त्याच्याजवळील १४ कार्डबोर्ड बॉक्‍समध्ये जलशुद्धीकरण यंत्र सापडले.

एम्फेटामाईन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; १५ कोटींचं ड्रग्ज हस्तगत
SHARES

नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात १५ कोटी रुपयांचे एम्फेटामाईन ड्रग्ज हस्तगत करून महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं (डीआरआय) दोघांना अटक केली आहे. या तस्करीत एका नायजेरियन तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवकुमार शर्मा (३८) व उगोची चिकेलू (३५) अशी या दोघांची नावे आहेत. तसंच, या प्रकरणी डीआरआयचं अधिकारी अधिक तपास करत आहेत.


१५ किलो ड्रग्ज 

नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात एका टॅक्सी चालकाच्या मदतीनं नायजेरियन ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी बेलापूर परिसरात सापळा रचून शिवकुमार शर्मा या टॅक्सीचालकासह त्याच्या टॅक्सीतील चिकेलू या नायजेरियन तरुणाला ताब्यात घेतलं. मात्र, दोघांच्या अंगझडतीत आणि बँगेत पोलिसांना काहीही आढळून आले नाही. परंतु, हे दोघंही तितकेच गोंधळलेले होते. दोघांजवळील सामानाची तपासणी केली असता  त्यात देखील काहीच आढळून आलं नाही. अखेर त्याच्याजवळील १४ कार्डबोर्ड बॉक्‍समध्ये जलशुद्धीकरण यंत्र सापडलं. हे यंत्र खोलून पून्हा जोडण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळं डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या यंत्रांची पाहणी केली. त्यावेळी त्यामधील सिलिंडरमध्ये १५ किलो ३४० ग्रॅम एम्फोटामाईन सापडलं. या 'एम्फेटामाईन' ड्रग्जची बाजारात किंमत १५ कोटी रुपये इतकी आहे.


पोस्टामार्फत तस्करी

काही दिवसांपूर्वी उगोची यानं शर्माच्या टॅक्सीतून प्रवास केला होता. त्यानंतर दोघेही अनेकदा तस्करीसाठी एकत्र जात होते. अंमली पदार्थ असलेल्या ३ बॅगा वाशी टपाल कार्यालयात देण्याच्या सूचना उगोचीनं शर्माला दिल्या होत्या. तेथून पोस्टामार्फत या ड्रग्सची परदेशात तस्करी करण्याचा उगोचीचा कट होता. त्यानं यापूर्वी शर्मामार्फत भारतातील पत्त्यावर 'मेथाएम्फेटामाईन' नावाचं अमली पदार्थही पोस्टामार्फत पाठवलं होतं. तेव्हापासून शर्मा तस्करीत उगोचीला मदत करत होता असं पोलीस तपासात समोर आलं.



हेही वाचा -

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मंत्रालयात धडकणार

गुरुवारी मुंबई आणि शुक्रवारी ठाणेकरांना अनुभवता येणार शून्य सावली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा