Advertisement

आज शून्य सावलीचा दिवस

मुंबईकरांना गुरुवार म्हणजे आज दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी, तर ठाणेकरांना १७ मे म्हणजे शुक्रवार रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येणार आहे.

आज शून्य सावलीचा दिवस
SHARES

कोणत्याही ठिकाणी जाताना आपली सावली आपल्या सोबत असते. मात्र, गुरुवार हा शून्य सावलीचा दिवस असल्यानं मुंबईसह ठाणेकरांची सावली अदृश्य होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. मुंबईकरांना गुरुवार म्हणजे आज दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी, तर ठाणेकरांना १७ मे म्हणजे शुक्रवार रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल. 


शून्य सावलीचा अनुभव

'उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपण असतो, त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्यादिवशी सारखी होते, त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. मुंबईचे अक्षांश उत्तर १९ अंश आहेत. गुरुवारी सूर्याची क्रांती उत्तर १९ अंश होणार असल्यानं सुर्य आकाशात ठीक डोक्यावर येणार असून, मुंबईकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल' अशी माहिती सोमण यांनी दिली.

ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याणच्या रहिवाशांना शुक्रवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येणार आहे.



हेही वाचा -

शिवडीत नागाच्या दंशामुळं सर्पमित्राचा मृत्यू

'डेक्कन क्वीन'चा प्रवास होणार आणखी लवकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा