मछिंद्र चाटेंना दोन महिन्यांचा कारावास

  Mumbai
  मछिंद्र चाटेंना दोन महिन्यांचा कारावास
  मुंबई  -  

  चाटे कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा मछिंद्र चाटे यांना महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल 17 वर्षांपूर्वी केलेले विधान चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना 17 वर्षांपूर्वीच्या प्रकरणी दोषी ठरवत दोन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

  नोव्हेंबर 2000 साली तत्कालीन शिक्षण मंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे चाटेंनी केली होती. मात्र चाटे यांच्या मागणीनंतरही कुठलीही कारवाई न झाल्याने चाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन विलासराव हे 'षंढ आणि कणाहीन' असल्याचं म्हटले होते. तसेच एका मराठी वृत्तपत्रात दोन पत्रकं प्रसिद्ध करून आपल्या शब्दांचा पुनरुच्चारही केला होता.

  2000 साली चाटे कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी मदन नागरगोजे हा बारावीच्या परीक्षेत पहिला आला होता. मात्र या विद्यार्थ्याचा चाटे कोचिंग क्लासेसशी संबंध नसल्याचा दावा तत्कालीन शिक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली. ज्यात नागरगोजे हा चाटे कोचिंग क्लासचाच विद्यार्थी असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर चाटे यांनी अनिल देशमुखांवर कारवाईची मागणी केली होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कुठलीही कारवाई न केल्याने चाटे यांनी विलासरावांबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.