'परे'कडून फुकट्यांना दणका


'परे'कडून फुकट्यांना दणका
SHARES

उपनगरीय रेल्वेमध्ये सतत सूचना देऊनही रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशाच फुकट्यांना 'परे'ने दणका देत सुमारे 11 कोटी 84 लाखांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे अशा बाबींचा समावेश असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

मध्य रेल्वेकडून २०० तिकीट दलालांवर कारवाई

परेने फुकट्यांकडून केली दंडवसुली


पश्चिम रेल्वे प्रशासनाने मे महिन्यात फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण 2 लाख 47 हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. मे महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत 1,037 भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांची रेल्वे परिसरातून हकालपट्टी देखील करण्यात आली. तर 108 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. मे महिन्यामध्ये तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये 226 जणांना पकडण्यात आले आहे. रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरुच ठेवण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा