Advertisement

मध्य रेल्वेकडून २०० तिकीट दलालांवर कारवाई


मध्य रेल्वेकडून २०० तिकीट दलालांवर कारवाई
SHARES

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना तिकीट कन्फर्म होईपर्यंत सामान्य प्रवाशांना नेहमीच ताटकळत वाट पहावी लागते. पण तिकीट दलाल अधिक पैसे आकारून अगदी आरामात तिकिटाचे आरक्षण मिळवून देतात. याच तिकीट दलालांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाई केली आहे. सीएसटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकिटांची दलाली केली जाते. उन्हाळ्यात तर नियमित असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्यांची तिकिटेही दलाल वेगवेगळ्या माध्यमांतून बुक करतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना साधे कन्फर्म तिकीट मिळणेही शक्य नसते. त्यामुळे वेटिंग लिस्टही मोठी असते.


हेही वाचा -

वाढत्या घातपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिस सज्ज

माटुंगा स्थानकाच्या 'कारभारी' महिला


मध्य रेल्वे आरपीएफने 20 मे पर्यंत केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत 29 प्रकरणे समोर आणली आहेत. जानेवारी 2017 पासून केलेल्या कारवाईत एकूण 71 प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये 85 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दलालांकडून 13 लाख 77 हजार 783 रुपये किंमतीची 548 तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. मध्य रेल्वेवर 2016 मध्ये आरपीएफने केलेल्या कारवाईत 188 प्रकरणे समोर आली होती. त्यामध्ये 43 लाख 81 हजार 267 रुपये किंमतीची 12,261 तिकिटे जप्त करण्यात आली होती. यावेळी 200 हून अधिक दलालांवर कारवाई करण्यात आल्याचे आरपीएफने सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा