माटुंगा स्थानकाच्या 'कारभारी' महिला

  Matunga
  माटुंगा स्थानकाच्या 'कारभारी' महिला
  मुंबई  -  

  पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांत दबदबा निर्माण करणाऱ्या महिलांची मक्तेदारी आता रेल्वेतही दिसत आहे. बुकींग क्लार्क, तिकीट तपासणीस, स्थानक व्यवस्थापकापासून रेल्वेच्या सर्वच महत्त्वांच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागांत विखुरलेल्या या माहिला आता एकाच स्थानकावर एकत्रितपणे काम करत नारीशक्तीचा दम दाखवणार आहेत. ते स्थानक आहे माटुंगा. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील सर्व कामकाजाची धुरा लवकरच 30 महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. या निर्णयाची आठवड्याभरात अंमलबाजावणी होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास मुंबईतील महिलाराज असणारे माटुंगा हे पहिलेवहिले स्थानक ठरणार आहे.

  मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात एकूण 4 फलाट आहेत. रोज शेकडो लोकलच्या फेऱ्या आणि लाखो प्रवाशांची वर्दळ या स्थानकात असते. त्यात 11 बुकिंग क्लार्क, 7 टीसी, 2 मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, 5 रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारी, 5 पॉईंट पर्सन्स, 2 उद्घोषक आणि एक स्थानक व्यवस्थापक अशी विभागणी असणार आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

  महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीने नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. त्या धर्तीवरच माटुंगा स्थानकात महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांकडून देखील या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माटुंगा स्थानकाप्रमाणे भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वे आणखी प्रयत्न करणार आहे. रेल्वेच्या अनेक विभागांमध्ये काम करून महिलांनी कार्यक्षमता दाखवून दिल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

  मध्य रेल्वेतील पहिल्या महिला कर्मचारी :
  पहिली महिला महाव्यवस्थापक - सौम्या राघवन (1973 बॅच, रेल्वे ऑफिसर)
  पहिली महिला स्टेशन मास्टर - ममता कुलकर्णी ( कुर्ला स्थानक 19 मे 1992
  पहिली महिला गार्ड - श्वेता गोने

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.