मास्क घालण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लाँक

मास्क का घातले नाही अशी विचारणा केली. मास्क न घालण्याच्या कारणावरून दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने शाब्दीक वादाचे रुपांतर हाणामारी झाले.

मास्क घालण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लाँक
SHARES

कोरेना हा संसर्ग जन्य रोग असल्यामुळे तो कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्यास  इतरांनाही त्याची बाधा होऊ शकते. ऐकीकडे कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना. काही बेशिस्त नागरिकांकडून कोरोना संदर्भात घालून दिल्याच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. भांडुपमध्ये मास्क (Mask) का नाही घातला असे विचारताच एका महिलेनं पालिका कर्मचाऱ्यांवर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आरोपी महिलेनं पालिकेच्या कर्मचारी दर्शना चौहाण यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ मोतीबाईवाडी परिसरात २ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या महिला रोहिणी सुरेश दोंदे, शोभा दोंदे आणि सीमा भेंडाळे या संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास विना मास्क रस्त्यावर फिरत होत्या. तसंच रस्त्यावर थुंकत असल्याचे त्यावेळी या परिसरात कर्तव्यावर असलेल्या पालिकेच्या कर्मचारी दर्शना चौहाण यांना निदर्शनास आले. दर्शना यांनी आरोपी रोहिणी दोंदे यांना मास्क का घातले नाही अशी विचारणा केली. मास्क न घालण्याच्या कारणावरून दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने शाब्दीक वादाचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या तिन्ही महिलांनी मिळून दर्शना यांना लाथा बुक्याने मारहाण केली.

हेही वाचाः- मुंबई महापालिका करणार भटक्या श्वानांचं लसीकरण

ऐवढ्यावरच न थांबता तिघींनी रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक दर्शना यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत दर्शना या जमिनीवर कोसळल्या. दर्शना यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकारी शीतल लांगळे यांनी दर्शना चौहाण यांना मुलुंड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दर्शना चौहाण यांच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहिंणी दोंदे, शोभा दोंदे आणि सीमा भेंडाळे या तिंघीविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा