रिक्षातील महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावला, महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू

कन्मिला कलिना सांताक्रूझ परिसरात राहतात. त्या मैत्रीणीसोबत ठाण्यातील एका मॉलमध्ये काम करतात. बुधवारी मॉलमधूल घरी निघालेल्या या दोघींनी कलिना येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली.

रिक्षातील महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावला, महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू
SHARES

मोबाइल चोरट्यामुळे (mobile thieves) एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ठाण्यामध्ये (thane) घडली आहे. बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या मोबाईल चोरट्याने रिक्षातून जात असलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला. त्यामुळे तोल जाऊन महिला रिक्षातून खाली पडली. यामध्ये गंभीर दुखापत होऊन या महिलेचा मृत्यू (woman died) झाला. 

ही घटना पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नका परिसरात घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसानी दोघांना अटक केली आहे. कन्मिला रायसिंग (२७) असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला मुळची मणिपूरमधील आहे.

 कन्मिला कलिना सांताक्रूझ परिसरात राहतात. त्या मैत्रीणीसोबत ठाण्यातील एका मॉलमध्ये काम करतात. बुधवारी मॉलमधूल घरी निघालेल्या या दोघींनी कलिना येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांची रिक्षा तीन हात नाकाजवळ आल्यानंतर मागून दोघे दुचाकीवरून आले. दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने धावत्या रिक्षातील कन्मिला यांच्या हातातील मोबाईल खेचला. मोबाईल वाचविण्यासाठी कन्मिलाने प्रयत्न केला. यामध्ये त्या रिक्षातून तोल जाऊन  खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जवळच्या एका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविले. मात्र, दीड तासानंतर रात्री ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपींना अटक करण्यासाठी  नौपाडा पोलिसांनी वेगवेगळी पथके बनवली. तांत्रिक माहितीच्या आधारे दोघा आरोपीना अटक करण्यात आली.हेही वाचा -

पुढचे ३ दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा