तिहेरी तलाकप्रकरणी मौलानाला अटक

सर्वोच्च न्यायालयाचं उल्लघंन करणाऱ्या मौलाना मोहम्मद उमर शेख (५५) याला ट्राॅम्बे पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद हा ट्राॅम्बेतील मेहराज मस्जिदमध्ये काम करतो.

तिहेरी तलाकप्रकरणी मौलानाला अटक
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधात हरकत घेतली असताना सर्वोच्च न्यायालयाचं उल्लघंन करणाऱ्या मौलाना मोहम्मद उमर शेख (५५) याला ट्राॅम्बे पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद हा ट्राॅम्बेतील मेहराज मस्जिदमध्ये काम करतो. 


काय आहे प्रकार?

ट्राॅम्बेच्या चिताकॅम्प परिसरात कनिस शफिक ही घटस्फोटीत महिला आपल्या दोन मुलांसह तिच्या कुटुंबियांसोबत रहात होती. त्याच वेळी घरातल्यांनी दुसरं लग्न करण्याचा प्रस्ताव सूचवला. बघाबघीत मोहम्मद उमर शेख यांचं स्थळही त्यांना चालून आलं. उमर शेख यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे त्यांनी कनिस शफिक यांना मागणी घातली होती. मात्र मुलांचा संभाळकरण्याच्या अटीवरूनच कनिसा हे लग्न करण्यास तयार झाली.


कधी झाला विवाह?

२८ एप्रिल २०१७ रोजी दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर सुरुवातीचे काही महिने दोघांनी संसार व्यवस्थित केला. मात्र कालांतराने मुलांचा संभाळ करण्यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. या वादातून उमरने कनिसला अनेकदा मारहाणही केली. तसंच तिला लग्नात घरातल्यांनी दिलेले दागिने काढून घेत पुन्हा तिच्या घरी पाठवले.

याबाबत कनिसाच्या घरातल्यांनी ट्राॅम्बेच्या उमर शेख कार्यरत असलेल्या मशिदीतील मौलानांना ही बाब सांगितल्यानंतर उमर पुन्हा कनिसाला घेऊन घरी परतला. मात्र घरी आल्यानंतर दोघांमध्ये भांडणं होतच होती. 


दुसरं लग्न करण्याची दिली धमकी

२७ आॅक्टोबर रोजी उमरने कनिसाला तिच्या माहेरी सुट्टी निमित्त पाठवले. त्यानंतर त्याने खोली भाड्याने देऊन स्वतः दुसरीकडे राहू लागला. कालांतराने कनिसा घरी परतली असता घराला कुलूप होते. त्यावेळी तिने उमरला फोन केला असता त्याने तिला घरातल्यांकडून १ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर दुसरं लग्न करण्यासाठी धमकावलं. कनिसाला उमरपासून दिवस गेले होते. काही महिन्यांतच तिची प्रसुती देखील झाली. मुलगा झाल्यानं उमर त्याला स्वतःजवळ ठेवण्यासाठी कनिसासोबत भांडत होता.


अखेर मौलानाला अटक

याप्रकरणी कनिसाने ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याचा राग अनावर झाल्याने मोहम्मद उमर शेखने कनिसाला मोबाइलवरच तीन तलाक दिला. याप्रकरणी कनिसाने गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मेघा नरवडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचं उल्लघंन केल्याप्रकरणी उमर शेख या मौलानाविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.  


हेही वाचा - 

तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचा अध्यादेश जारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा