मास्क घालायला सांगितला म्हणून मार्शल महिलेला मारहाण

एका प्रवासी महिलेनं एका महिला मार्शलला मारहाण केली आहे.

मास्क घालायला सांगितला म्हणून मार्शल महिलेला मारहाण
(Video Screenshot)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं कोरोनाव्हायरसच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात मार्शल नेमले आहेत. शिवाय, राज्य सरकारनं नागरिकांना मास्क घालून सामाजिक अंतरांच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

पण नुकतंच एका प्रवासी महिलेनं एका महिला मार्शलला मारहाण केली आहे. अश्विनी चव्हाण असं  महिला मार्शलचं नाव आहे. अश्विनीला चारकोप लिंक रोड इथल्या महिला प्रवाशानं मारहाण केली.

सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मुखवटा न वापरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड म्हणून आकारण्याचे आदेशदिले आहेत. त्याच आदेशाचे पालन अश्विनी करत होती. जेव्हा मार्शलनं त्या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं तिला पकडले आणि मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तिथून जाणाऱ्या बर्‍याच लोकांनी त्या बाईला रोखण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:ची चूक लक्षात न घेता अश्विनीला निर्दयपणे मारहाण केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागरुकता पसरवण्यालाठी पालिकेनं मार्शलची नेमणूक केली. ज्यांना शहर आणि त्या आसपासच्या भागात तैनात करण्यात आलं आहे. कोरोनाविषयी माहिती असूनही मुंबईतील सुशिक्षित वर्गसुद्धा अनेकदा बेजबाबदारपणे वागतात.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नागरिकांकडून दंड वसूल करणं हे त्यांचे उद्दीष्ट नाही. परंतु ते जे पाहत आहेत त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार फेस मास्क परिधान करणं आवश्यक आहे. नियमांचं उल्लंघन करणार्‍यांना २०० रुपये दंड भरावा लागतो. व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यास होणार्‍या धोक्याबद्दल जन जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हे केलं गेलं आहे.हेही वाचा

सचिन वाझेंच्या प्रॅडोसहीत २ मर्सिडिज जप्त

३०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाचा उडाला बार, पालिकेच्या कारवाईनं वाजला बँड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा