रिक्षा चालकाने केला प्रवाशी महिलेचा विनयभंग

रिक्षा चालवताना. महिलेसमोर पॅन्टची चेन खोलून अश्लील चाळे केले.

रिक्षा चालकाने केला प्रवाशी महिलेचा विनयभंग
SHARES

महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षा चालकास वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. दिनेश यादव असे या आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी खार पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी खार पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- कुख्यात गुंड अरूण गवळीने यासाठी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

वांद्रेच्या उच्चभ्रूवस्तीत राहणारी ३७ वर्षीय महिला ही लेखिका आहे. ती सध्या एका खासगी कंपनीत कार्यरत असून २३ जानेवारी रोजी ती सकाळी योगा क्लासला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिने खारला जाण्यासाठी वांद्रे येथून रिक्षा पकडली. त्यावेळी यादवने रिक्षा चालवताना. महिलेसमोर पॅन्टची चेन खोलून अश्लील चाळे केले. सुरूवातीला महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र खार येथे रिक्षातून उतरताना त्याने पून्हा महिलेसमोर पाहून अश्लील चाळे केल्यानंतर महिलेचा पारा चढला. तिने त्याला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत रिक्षा चालक पैसे घेऊन पळ काढत होता. त्यावेळी महिलेने रिक्षाचा नंबर लिहून घेत, घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितले.

हेही वाचाः- दारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या

त्यानंतर दोघांनी वांद्रे पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली असता. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने सांताक्रूझ परिसरातून यादवला अटक केली. दिनेशच्या चौकशीत तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले असून हा गुन्हा पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा