कुख्यात गुंड अरूण गवळीने यासाठी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

जामसांडेकर याची हत्या करण्यासाठी अरूण गवळीने तब्बल ३० लाखांची सुपारी घेतले होते.

कुख्यात गुंड अरूण गवळीने यासाठी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव
SHARES

हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरूण गवळी उर्फ ‘डॅडी’ ने त्याच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २००८मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Shiv Sena corporator Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळीला (Arun Gawli) याला जन्मठेपेची शिक्षा (Life sentence) सुनावण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालया (Supreme court)ने महाराष्ट्र सरकारला जाब विचारत नोटीस बजावली आहे.

हेही वाचाः- कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर

मुंबई उपनगरातील जमीन व्यवहारावरून राष्ट्रवादीचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी अरुण गवळीला दिली होती. हा सौदा ३० लाखामध्ये ठरला. अरुण गवळीने पुढे ही जबाबदारी प्रताप गोडसेवर सोपवली होती. प्रताप गोडसेने हे नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांच्यावर सोपवले. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी त्यांनी प्रत्येकी २० हजार रुपये अॅडव्हान्सही दिला. २ मार्च २००७ रोजी विजयने जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. या प्रकरणात  २००८मध्ये कुख्यात गुंड आणि भायखळा(Byculla)चे माजी आमदार अरूण गवळी याचा सहभाग निश्चित झाला. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जामसांडेकर याची हत्या करण्यासाठी अरूण गवळीने तब्बल ३० लाखांची सुपारी घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी अरुण गवळीला २१ मे २००८ रोजी अटक केली. या खटल्यातील १५ आरोपींपैकी १२ जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं. त्यात कुख्यात गुंड अरूण गवळीचा ही समावेश आहे. तर ३ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती.

हेही वाचाः- आशा गवळीवर अटकेची टांगती तलवार

गुन्हे शाखेने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार गिरीने अशोक कुमार जायसवार या सहकाऱ्यासह जवळजवळ १५ दिवस कमलाकर जामसांडेकरवर लक्ष ठेवले. त्यानंतर २ मार्च २००७ ला जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली. गवळीला या घटनेनंतर १ वर्षांनी पकडण्यात आले. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती. अरुण गवळी सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. याआधीही २ ते ३ वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता.

हेही वाचाः - भायखळ्यात गवळी गँग सक्रिय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा