इंग्लिश शाळेतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार


इंग्लिश शाळेतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
SHARES

मुंबईतील माझगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेतील ४ वर्षांच्या मुलीवर महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी भायखळा पोलिस ठाण्यात शाळेतील महिला कर्मचारी लिली लोबो यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?

ही चार वर्षांची पीडित मुलगी माझगाव परिसरातील इंग्लिश मीडिअम शाळेत नर्सरीला शिकत आहे. मागील काही दिवसांपासून पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे मुलीच्या पालकांनी तिला दवाखान्यात दाखल केलं. त्यावेळी मुलीच्या गुप्तांगावर जखम झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. पालकांनी याबाबत मुलीकडे विचारणा केल्यावर शाळेतील महिला कर्मचारी लिली लोबोने तिच्यावर अत्याचार केल्याचं सांगितलं.


२० वर्षांपासून नोकरीला

याबाबत मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार करत भायखळा पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी शाळा प्रशासनाने लिलीला नोकरीवरून काढून टाकलं आहे. लिली मागील २० वर्षांपासून या शाळेत काम करत होती. पोलिसांनी लिलीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.हेही वाचा-

१२ वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी

मुंबईही कठुआच्या वाटेवर..? रोज २ महिलांवर बलात्कारRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा