विवाहितेची सोशल मिडियावर बदनामी; तरूणाला दिल्लीतून अटक

लोहताज अस्मिताच्या फेसबुक अकाऊंटवरून तिचे फोटो डाऊनलोड करून त्याखाली अश्लील माहिती देऊ लागला. याची माहिती अस्मिताच्या मैत्रिणींनी तिला दिली. त्यानंतर अस्मिताने पोलिसात धाव घेतली.

विवाहितेची सोशल मिडियावर बदनामी; तरूणाला दिल्लीतून अटक
SHARES

जात वेगळी असल्याने मैत्रिणीशी लग्न न करता अाल्याने लोहतज शर्मा या एका तरूणाने फेसबुकवर तिची बदनामी करण्यास सुरूवात केली.  सोशल मिडियावर तरुणीच्या फोटोसह अश्लील माहिती पोस्ट करू लागला. याबाबत तरुणीने समजावूनही त्याने असले प्रकार थांबवले नाहीत. अखेर विवाहितेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली आहे.


नक्की काय घडलं?

दिल्लीत कुटुंबियांसोबत राहणारी तरुणी अस्मिता शेख (नाव बदललेले आहे) दिल्लीतीलच एका काॅलेजमध्ये शिक्षण घेत होती. काॅलेज परिसरात राहणाऱ्या आणि सोबत शिक्षण घेणाऱ्या लोहताजसोबत तिची मैत्री झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही ६ वर्ष एकत्र होते. दोघांना लग्न कराचयं होतं.  मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने त्यांचे प्रेम अस्मिताच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. अखेर अस्मिताचे लग्न  वांद्रे येथे राहणाऱ्या तरुणासोबत लावून दिले.


अश्लील माहितीसह फोटो व्हायरल

या प्रकाराने चिडलेला लोहताज अस्मिताच्या फेसबुक अकाऊंटवरून तिचे फोटो डाऊनलोड करून त्याखाली अश्लील माहिती देऊ लागला. याची माहिती अस्मिताच्या मैत्रिणींनी तिला दिली. त्यानंतर अस्मिताने पोलिसात धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी विशेष पथक बनवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कांबळे, उपनिरीक्षक सोमनाथ काले आणि गिरीश चव्हाण यांचे पथक लोहताजचा शोध घेण्यासाठी दिल्लीला गेले. मात्र मागील चार दिवसांपासून लोहताज घरीच आला नव्हता. त्यानंतर घरी परतलेल्या लोहताजला पोलिसांनी बेड्या ठोकून मुंबईला आणले. 



हेही वाचा - 

नालासोपारा स्फोटकप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

नोकरीच्या आमिषाने 93 लाखांना गंडा





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा