परदेशी नोकरीच्या मोहापायी तरुणांना खावी लागतेय जेलची हवा!


परदेशी नोकरीच्या मोहापायी तरुणांना खावी लागतेय जेलची हवा!
SHARES

परदेशातील बोटींवर नोकरी करण्याचा मोह पाच भारतीय तरुणांना भलताच महागात पडला. स्फोटकं भरून नेत असलेल्या जहाजांवर या पाच जणांसह तीन परदेशी नागरिकांना नोकरीस ठेवण्यात आलं होतं. ग्रीसच्या तटरक्षक दलानं हे जहाज ताब्यात घेत आठही जणांना अटक केली असून मागील दोन महिन्यांपासून हे सर्व तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या तरुणांच्या सुटकेसाठी आता त्याचे कुटुंबिय सरकार दरबारी फेऱ्या मारत आहेत.


गलेलठ्ठ पगाराची नोकरी

पंजाबच्या गुरूदासपूरचा राहणारा भूपेंदर सिंग (२०) इंटरनेटवरून सतत नोकरीच्या शोघात होता. अखेर नवी मुंबईतील अोमेगा कंपनीने भूपेंदरला अॅन्ड्रोमेडा या मालवाहतूक जहाजावर रिक्रूटमेंट दिली. त्यानुसार १४ एप्रिल २०१७ रोजी भूपेंदर जहाजावर नोकरीसाठी गेला. त्या जहाजावर भूपेंदरसोबत सतीश कुमार, जयदीप ठाकूर, रोहतश, गगनदीप कुमारसह अन्य तीन कामगार परदेशातून आले होते. या सर्वांना कंपनीने सुरवातीला ८ तास ड्युटी आणि ३५० डाॅलरची आॅफर दिली होती. त्यानंतर त्यांचे काम पाहून त्यांना ८०० डाॅलर प्रतिमहिना देण्याचे ठरले होते.


ग्रीसने पकडले स्फोटकांचे जहाज

जानेवारी महिन्यात त्यांचे जहाज तुर्कस्तानहून जबूतीला जाण्यासाठी निघाले होते. अचानक समुद्रात आलेल्या वादळामुळे त्यांचे जहाज ग्रीस देशाच्या हद्दीत थांबले होते. ग्रीस देशाच्या तटरक्षक दलाने जहाजाची तपासणी केल्यावर कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली. स्फोटकांबाबत कोणतिही माहिती या आठ जणांना नव्हती. लिबियामधील तणावदर्शक परिस्थितीमुळे तेथे ही स्फोटकं नेत जात असल्याचे समजते. ग्रीसच्या तटरक्षक दलाने पाच भारतीय तरुणांसह तीन परदेशी तरुणांना बंदी बनवले आहे.


माझा मुलगा जाऊन आठ ते नऊ महिने झाले. त्याने अद्याप एक रुपयाही पाठवलेला नाही. अटक केल्यानंतर परदेशात त्याला कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही महिन्याला हजारो रुपये पाठवत आहोत. सरकारकडे त्यांच्या सुटकेसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार झाले. सकारात्मक उत्तरेही दिली जात आहेत. मात्र मुलांना लवकरात लवकर सोडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- बालकरचंद सिंग, भूपिंदरचे वडील


हेही वाचा -

दिलीप कुमारांचं घर बळकावू पाहणाऱ्या बिल्डराच्या कोठडीत वाढ

एटीएसने ISISच्या वाटेवरील ११८ जणांना रोखलं, २० जण मुंबईतले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा